धक्कादायक! कोहलीने केली कुंबळेला शिवीगाळ

टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनं राजीनामा दिल्यावर आता एक भारतीय क्रिकेटच्या इतिहासाला बट्टा लावणारी घटना पुढे आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या आधी कुंबळे आणि विराट कोहली यांच्या जोरदार भांडण झालं. यावेळी कोहलीनं कुंबळेंना शिवीगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोहलीनं वापरलेल्या अपशब्दांमुळे अनिल कुंबळेंचा संताप झाला. आणि गेले अनेक महिने सुरू असलेला संघर्ष चव्हाटयावर आला.

कुंबळेंनी दिलेल्या राजीनामा पत्रात त्यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दात व्यक्त केली आहे. मी हेड कोच म्हणून काम करण्यावर विराट कोहलीचा आक्षेप होता. विराटला माझी कार्यपद्धती आवडत नव्हती. बीसीसीआयनं याबाबत मला सांगितलं. बीसीसीआयनं समझोता घडवण्याचा प्रयत्न केला. मात्र असं खूप दिवस चालणार नाही. त्यानंतर मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं अनिल कुंबळेनं पत्रात स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *