सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज वेगाने पुढे जात असला तरी त्याची मानसिकतेत फारसा बदल होत नाहीये. म्हातारपणाची काठी, वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा अशी मानसिकता असलेला समाज आजही आहे.
मुलगा व्हावा म्हणून अनेक जोडपी काहीही करायला तयार असतात. मुलगा व्हावा यासाठी गुजरातमधील एका जोडप्याने तब्बल १४ मुलींना जन्म दिला.
रामसिंग संगूद असे या शेतक-याचे नाव आहे. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील झारिभुंजी गावात हा शेतकरी राहतो. मुलगा होईल या आपल्या पतीच्या हट्टापायी रामसिंगची पत्नी कनू हीने १४ मुलींना जन्म दिला. २०१३ मध्ये या जोडप्याला पुत्ररत्नही झाले. मात्र त्यांना आणखी एक मुलगा हवा आहे. त्यासाठी कनू सोळाव्यांदा गरोदर आहे.
याबाबत बोलताना रामसिंग म्हणाला, बहिणींची काळजी घेण्याची जबाबदारी भावावर असते. एकटा मुलगा ही जबाबदारी कशी सांभाळणार. त्यामुळे दुसरा मुलगा असेल तर ही जबाबदारी उचलेल आणि कुटुंबालाही सांभाळण्यात मदत करेल.

