बनावट पदवी, ‘आप’च्या आणखी एका आमदारावर आरोप

बनावट पदवी, ‘आप’च्या आणखी एका आमदारावर आरोप

दिल्लीचे माजी कायदामंत्री जितेंदर सिंग तोमर यांच्यानंतर आता आम आदमी पक्षाचा आणखी एक आमदार बनावट पदवी प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रतित्रापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आमदार भावना गौर यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून २५ जुलैला पुढील सुनावणी आहे.

गौर यांनी डिसेंबर २०१३ आणि फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठीच्या प्रतिज्ञपत्रात दिलेल्या शैक्षणिक माहितीमध्ये तफावत असल्याचे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले आहे.

दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, २०१३च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली शैक्षणिक पात्रता १२ वी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपले शिक्षण बीए आणि बीएड झाल्याचे म्हटले आहे.

१४ महिन्यांच्या कालावधीत या दोन पदव्या मिळवणे कसे काय शक्य आहे. या दोन्ही पदव्या मिळवण्यासाठी साधारण सात वर्षांचा कालावधी लागतो.

गौर यांनी २०१३ मधील प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिली आहे अथवा १५ जानेवारी २०१५ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक अर्हतेबाबत चुकीची माहिती दिल्याचे याचिकेत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *