एक रुपयाची नोट, सव्वा रुपया खर्च

एक रुपयाची नोट, सव्वा रुपया खर्च

रिझव्‍‌र्ह बँकेने २० वर्षांनी एक रुपयाची नोट छापण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु यासाठी १.१४ रुपयांचा खर्च येत असल्याचे माहिती अधिकारात मागविलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट झाले आहे.
केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या छपाई आणि टांकसाळ सुरक्षा महामंडळाने ही माहिती दिली आहे. २०१४-१५ या आर्थिक वर्षांतील लेखाजोखा माहिती अधिकारात मागविण्यात आला होता. यामध्ये एक रुपयाची नोट छापायला १.१४ रुपये खर्च येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही माहिती सुभाष चंद्रा अगरवाल यांनी मागविली होती.
एक रुपयाची नोट छापायचा खर्च वाढल्याने १९९४ मध्ये छपाई बंद करण्यात आली होती. याच कारणावरून दोन व पाच रुपयांच्या नोटांची छपाई थांबविण्यात आली होती.केंद्रीय अर्थमंत्रालयाने १६ डिसेंबर, २०१४ मध्ये काढलेल्या अधिसूचनेमध्ये ६ मार्च, २०१५ पासून एक रुपयाची नोट चलनात आणण्याचा आदेश दिला होता. विशेष म्हणजे या नोटेवर नेहमीप्रमाणे आरबीआय गव्हर्नरांची सही नसून अर्थ सचिवांची सही छापण्यात येणार होती. यावर आक्षेप घेत अगरवाल यांनी या कृतीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *