स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

स्वतःच्या मुलीवर बलात्कार  करणा-या पित्याला रायगड   जिल्ह्यातल्या माणगाव सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. रायगड जिल्हयातल्या तळा तालुक्यातली ही घटना 2015 मध्ये उघडकीस आली होती.

या घटनेतल्या या विकृताच्या अत्याचारामुळे त्याची अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. या प्रकरणी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि 2 हजार रूपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *