लातूरमध्ये कोसळलं मुख्यमंत्री फडणवीस यांचं हेलिकॉप्टर

निलंग्याहून मुंबईकडे येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासहीत असलेले चारही जण सुरक्षित आहेत. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

उड्डाण भरताच हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित आहेत.

”मी आणि माझी टीम संपूर्णतः सुरक्षित आहे. कोणतीही काळजी करण्याचं कारण नाही”, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *