विवाहितेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे एका ४६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चिखली येथे ही घटना घडली. याप्रकरणी जयभीम भालेराव या नराधमाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरातील भीमशक्तीनगर येथे हा धक्कादायक प्रकार घडला. मध्यरात्रीच्या सुमारास पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून जयभीमने घरात घुसून महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेचा मुलगा घरात आला. या मुलाला देखील जयभीमने मारहाण केली. या घटनेनंतर जयभीम याने तेथून पळ काढला. पीडित महिलेने या संदर्भात निगडी पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी जयभीम भालेराव या नराधमाला अटक केली. पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *