लग्नानंतर पाचव्या दिवशी शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड जिल्ह्यातील उमरी गावात एका नवविवाहीत शेतकऱ्यानं आत्महत्या  केली आहे. इंद्रजीत मुधळ असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. पाच दिवसांपूर्वी म्हणजे १६ मे रोजी त्याचं लग्न  झालं होतं. इंद्रजीत आणि त्याचा भाऊ या दोघांमध्ये चार एकर कोरडवाहू शेती आहे.

या शेतावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं दीड लाख आणि जय शिवराज सहकारी बँकेचं एक लाख असं अडीच लाख रुपयांचं कर्ज  होतं. शिवाय लग्नासाठीही त्यानं खासगी कर्ज काढलं  होतं.. या कर्जाच्या विवंचनेतून  त्यानं लग्नानंतर अवघ्या पाच दिवसांतच गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *