दादरमधील फेरीवाल्यांचा विळखा कधी हटवणार?

डोंबिवली स्टेशनला फेरीवाल्यांचा विळखा   पडल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी डोंबिवलीमध्ये राडा केला. ठाणे महापालिकेने फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम राबवली. मात्र मुंबईत प्रत्येक स्टेशनबाहेर फेरीवाल्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. दादर  स्टेशनला फेरीवाल्यांचा विळखा कित्येक वर्षांपासून पडलेला आहे.

दादर स्टेशनवर पोहोचण्यासाठी प्रवाशांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मात्र महापालिकेला हे हाल दिसत नाहीत अशी स्थिती आहे. शिवसेनेच्याच ताब्यातली ठाणे मनपा फेरीवाल्यांविरोधात कारवाई करू शकते, मग मुंबई मनपा कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *