अंदमानात पोहोचलेला मान्सून येत्या 30 मे रोजी केरळात दाखल होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मान्सून 1 जूनला केरळात पोहोचल्यानंतर पुढच्या सात दिवसात महाराष्ट्रात पोहोचतो.
यंदा हवामान विभागाने 15 मे रोजी मान्सून अंदमान-निकोबार व्दीपसमूहामध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. पण त्याच्या एकदिवस आधीच 14 मे रोजी रविवारी मान्सूनचे अंदमानात आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.
असा होतो पावसाचा प्रवास
सर्वसाधारणपणे दक्षिण-पश्चिम मान्सूनचे आगमन २० मे रोजी अंदमानच्या समुद्रात होते. त्यानंतर, २५ मेपर्यंत अंदमान बेट, श्रीलंकेपासून म्यानमारपर्यंत मान्सून येतो. त्यानंतर १ जून रोजी केरळ येथून प्रत्यक्ष भारतीय उपखंडात मान्सूनचा प्रवेश होतो़.
