कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून सुनावण्यात आलेल्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात आज आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे. हेग येथे आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार आहे.
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्ताननं हेरगिरीचा ठपका ठेवत त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. याविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेत जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
पाकिस्तानी लष्कर न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानविरोधात हेरगिरी व हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणी भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करत सांगितले की, पाकिस्तानी लष्कर न्यायालयानं कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या शिक्षेवर तातडीनं अंमलबजावणी न होता जाधव यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक संभाव्य पर्यायाचा विचार करण्यात यावा.
कोण आहेत कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस विंग’ (रॉ) या गुप्तहेर संस्थेसाठी पाकिस्तानात हेरगिरी आणि विघातक कृत्यांची तयारी करत असताना पकडले गेले होते, असा पाकिस्तानचा दावा आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, जाधव यांना गेल्या वर्षी 3 मार्च रोजी बलुचिस्तानात मश्केल येथे अटक केली होती. त्या वेळी त्यांच्याकडे सापडलेल्या पासपोर्टवर त्यांचे नाव हुसेन मुबारक पटेल असे दाखवले होते. त्यावर ते सांगलीचे रहिवासी असून, ठाणे कार्यालयाने त्यांना 12  मे 2014 रोजी त्यांना पासपोर्ट दिल्याचा उल्लेखही आहे. पाकिस्तानने या आरोपाच्या समर्थनार्थ त्याच्या पासपोर्टची प्रतही प्रसिद्ध केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *