अंधश्रद्धेपोटी महिलेला दिले चटके

तुझ्या अंगात सैतान शिरलेला आहे, तो बाहेर काढावा लागेल,’ असे म्हणत एका तीसवर्षीय महिलेला पेटलेल्या कापराचे चटके देण्यात आले आहेत. ही घटना  मौजे उधवा येथे घडली असून, याबाबत तलासरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी भगतगिरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

उधवा गावातील पिंकी (सुरेखा) चौधरी हिला नेहमी दृष्टांत व्हायचे. ही गोष्ट तिने लोकांना सांगताच, तिला तुझ्या अंगात सैतान शिरला असून, तो बाहेर काढण्यासाठी गावातीलच ज्योत्स्ना माच्छी या भगतगिरी करणाऱ्या महिलेला भेटण्याचा सल्ला देण्यात आला. अंधश्रद्धाळू महिलांनी तिच्या मनात सैतानाविषयी भरवून दिल्याने ती उताऱ्यासाठी तयार झाली. तिकडे जाताच सैतान काढण्यासाठी तिने पिंकीला पेटत्या कापराचे चटके देण्यास सुरुवात केली. मात्र, थोड्याच वेळात या प्रकारामुळे आपल्याला चटके देऊन जखमी केल्याचे लक्षात आल्यावर, शुक्रवारी घडलेल्या या घटनेबाबत तलासरी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच, ज्योत्स्नाला अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *