काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना अन्नातून विषबाधा झाल्याने रविवारी संध्याकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं आहे. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
सोनिया गांधी यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अन्नातून विषबाधा झाली होती. त्यांची प्रकृती सध्या चांगली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल असे रुग्णालयातील प्रमुख डॉ. डी एस राणा यांनी सांगितले.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात सोनिया गांधींना श्वसनाच्या त्रासानंतर याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
