भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला

भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला  आहे, अवघ्या ६० सेकंदात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा बंकरचा धुराळा उडवून दिला आहे. याच बंकरच्या पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सैनिकांची निर्घृण हत्या केली होती, त्याला हे सडेतोड उत्तर दिलं असल्याचं म्हटलं जात आहे. कृष्णा घाटी जवळील हा बंकर उडवला आहे.

जेथे भारतीय सैनिकांची पाकिस्तानी सैनिकांनी निर्घृण हत्या केली होती, भारताच्या हा शहीद जवानांच्या हत्येला उत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानचा बंकर उडवला असावा असं म्हटलं जात आहे.

पाकिस्तानचा बंकर उडवल्यानंतर भारतीय जवानांनी मिशन यशस्वी पार पाडल्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेत पाकिस्तानचे काय नुकसान झाले आहे, याबाबत अजून माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *