गुगलचे सीईओ सुंदर पिचाई हे जगातील सर्वाधिक पगार घेणारे व्यक्ति बनले आहेत. गेल्यावर्षी २०० मिलियन अमेरिकन डॉलर पगार घेणाऱ्या पिचाईंना यंदा या रकमेच्या दुप्पट पगार मिळाला आहे.
गेल्या वर्षी पिचाई यांना ६५०,००० अमेरिकन डॉलर मिळाले होते. २०१५ मध्ये त्यांना ६५२,५०० अमेरिकन डॉलर एवढा पगार मिळाला होता. त्याशिवाय २०१६ मध्ये त्यांना ९९.८ मिलियन डॉलर त्यांना प्रतिबंधित स्टॉकच्या रुपात मिळाले होते. त्याच बरोबर अन्य रक्कम मिळून त्यांना २२,९३५ डॉलरही देण्यात आले होते.
पिचाई यांना सीईओ पदी बढती दिल्यानंतर वेतन वृद्धी कमिटीने त्यांना हा सर्वाधिक पगार दिला आहे. पिचाई यांनी अनेक यशस्वी उत्पादनांचं लाँचिंग केल्यानंच त्यांची वेतनवाढ करण्यात आल्याचं म्हटलं आहे.
