महाराष्ट्रदिनी पाण्यासाठी श्रमदान करा – आमिर खानचं आवाहन

एक मे महाराष्ट्र दिवस असून आपण सगळ्या महाराष्ट्रियन लोकांनी या दिवशी दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी, पाण्याच्या सुबत्तेसाठी श्रमदान करूया असं आवाहन आमिर खान व किरण राव यांनी केलं आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडीयो अपलोड केला असून पाणी फाउंडेशनच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
महाराष्ट्र दिवस आपल्या सगळ्या महाराष्ट्रियनांसाठी अभिमानाचा दिवस आहे असं सांगताना किरण राव व आमिर खान यांनी सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये 1000 पेक्षा जास्त गावं भाग घेत असल्याची माहिती दिली आहे. तसेच, ग्रामीण भागाच्या विकासासाठी योगदान देण्याची एक संधी या निमित्तानं शहरी लोकांना उपलब्ध होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. या दिवशी एक तास किंवा दोन तास जसे जमतील तसे या कामासाठी द्यावेत असं आवाहन आमिर खाननं केलं आहे. महाराष्ट्रात पाण्याची समृद्धी व्हावी आणि राज्य दुष्काळमुक्त व्हावं असं प्रत्येक महाराष्ट्रियन व्यक्तिला वाटत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *