ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी शरीरातील पाणी कमी झाल्याच्या कारणामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी गिरगावातील एचएन रिलायन्स फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांचा हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. यात फोटोमध्ये विनोद खन्ना त्यांना ओळखणंही कठीण झाले होते. आरोग्य तपासणीदरम्यान त्यांना मूत्रपिंडाचा कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले होते

विनोद खन्ना यांनी ‘मेरे अपने’, ‘कुर्बानी’, ‘पूरब और पश्चिम’, ‘रेशमा और शेरा’, ‘हाथ की सफाई’, ‘हेरा फेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसारखे अनेक शानदार सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी खलनायकाच्या भूमिका केल्या मात्र यानंतर त्यांना मुख्य नायकाचे सिनेमे मिळत गेले.
विनोद खन्ना यांनी 1968मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तर शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत ‘दिलवाले’ या सिनेमात ते शेवटचे दिसले होते.
ज्यावेळी विनोद खन्ना यांचा हॉस्पिटलमधील व्हायरल फोटो बॉलिवूड अभिनेता इरफान खानला धक्का बसला होता. ‘जर विनोद खन्ना यांच्यावर उपचार करण्यासाठी माझ्या शरीरातील एखादा अवयव दान करण्याची गरज भासली तर आपण त्यासाठी तयार आहोत’, अशी भावना इरफाननं व्यक्त केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *