सुरक्षा अभियान ट्रस्ट आयोजित चित्र प्रदर्शन आणि कार्यशाळा संपन्न…

सुरक्षा अभियान ट्रस्ट आयोजित चित्र प्रदर्शन आणि कार्यशाळा संपन्न…

20170418121332_IMG_3966

दिनांक  18 एप्रिल 2017 रोजी टाऊन हॉल, ठाणे येथे रस्ता सुरक्षा विषयक चित्रप्रदर्शन  सकाळी 9 ते संध्या. 6 वा.पर्यंत आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे  उर्मिला पारधे शिक्षणाधिकारी (TMC), डॉ.के म्पी पाटील सिव्हील सर्जन,  संजय ससाणे   उप.प्रादे. परिवहन अधिकारी, जिल्हाधिकारी येऊ न शकल्यामुळे त्यांच्या ऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी गलांडे, परिवहन आयुक्त डी.जी. जाधव (विद्यमान ग्रामीण आरोग्य योजनेचे प्रमुख)   व रस्ता सुरक्षा  संबधित विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.

प्रास्तावीक सुरक्षा अभियानचे संस्थापक, अध्यक्ष  डॉ.विलास ज. पवार यांनी  केले व त्यांनी रस्ता सुरक्षा अभियान कामकाजा बद्दल सविस्तर माहिती दिली. रस्ता सुरक्षे विषयक माहिती देणा-या  विशेषांकाचे  प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. प्रमुख पाहुणे व उपस्थीत मान्यवर यांची भाषणे झाली. या उदघाटन कार्यक्रमात अभियंते, मोटार वाहन अधिकारी,   डॉक्टर, नर्सेस, शिक्षक  मोठ्या संख्खेने उपस्थीत होते.

या दरम्यान कार्यशाळा  आयोजित करण्यात आल्या होत्या. यात   मोटार वाहन विभाग ठाणे , आरोग्य विभाग ठाणे, स्काउट गाईड प्रशिक्षक ,शिक्षक, नर्सिंग स्टाफ  सहभागी होते.

108 टोल फ्री विनामुल्य आपलकालीन रग्णवाहिका 20170418173033_IMG_4064सेवा या विषयी चित्रफीत तसेच रूग्णवाहिका दाखवून उपस्थीतांना मार्गदर्शन करण्यात आले.

रस्ता सुरक्षा विषयी विविध चित्रफीती कार्यशाळेत  दाखविण्यात आल्या . रस्ता सुरक्षा अभियानच्या विश्वस्त विशाखा पवार यांनी कार्यशाळेत उपस्थितांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.  या  कार्यशाळेत अनेक नामवंतानी सहभाग घेतला होता. वैभव काळे, विनायक जोशी,  राजश्री टोपे, डॉ. बाळासाहेब  या नामवतांनी रस्ता सुरक्षा विषयावर कार्यशाळेत भाग घेतलेल्यांना फार चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.   उपस्थित सर्वानी  कार्यशाळेचे  आयोजन केल्या बद्दल सुरक्षा20170418100051_IMG_3875 अभियानचे आभार 20170418171451_IMG_4038मानले  व चळवळीत सामावून घेण्याची विनंती  अनेकांनी केली.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.विलास पवार यांनी ” आपण वर्षभर रस्ता सुरक्षा विषयक कार्यक्रम राबविणार आहोत आणि त्या विषयी जनजागृती करण्यासाठी सातत्याने असे कार्यक्रम  करत राहणार आहोत” व आपण सुद्दा यात सहभागी व्हावे असे उपस्थितांना आवाहन केले व कार्यशाळेची सांगता झाली असे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *