“कृपया लग्नात पुस्तकांचा आहेर आणा”

लग्नाला येणा-या प्रत्येकांनी पैसे किंवा भांड्यांचा आहेर न आणता जुन्या पुस्तकांचा आहेर आणावा अशी विनंती त्याने केली होती. छत्तीसगढ इथे राहणारे प्रशांत महतो हे सिव्हल इंजिनिअर आहेत, पण त्याचबरोबर ते एक स्वयंसेवी संस्थाही चालवतात. या संस्थेमार्फत छत्तीसगढमधल्या गरिब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं दिली जातात. प्रशांत आणि त्यांचे इतर पाचशेहून अधिक स्वयंसेवक मिळून गरजू मुलांना जुनी पण उपयोगात येतील अशा पुस्तकांचे वाटप करतात, त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची अनेकांनी  दखल घेत त्यांचे खूपच कौतुक केलं आहे. गेल्या दोन वर्षांपांसून ते गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप करत आहेत. छत्तीसगमधल्या विविध शाळांतील ८५० विद्यार्थ्यांना त्यांनी आतापर्यंत ५० हजार पुस्तकांचे वाटप केले आहे.

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत तेव्हा तुमच्या आमच्या घरी लग्नाचे आमंत्रण असलेल्या अनेक पत्रिका आल्या असतील. आता यातल्या अनेक पत्रिकांच्या खाली ”कृपया भांड्यांचा आहेर आणू नका” अशा सूचना अनेकदा वाचायला मिळतात. पण लग्नात येताना कधी ‘पुस्तकाचा आहेर आणा ‘ असे लिहिलेली पत्रिका पाहिलीत का? नसेल तर छत्तीसगढमधल्या या वराची पत्रिका पाहा. गेल्याच आठव़ड्यात त्याचे लग्न पार पडले. लग्नसोहळ्याच्या पत्रिका त्यांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला वाटल्या त्यावर जे काही लिहिले होते त्यामुळे त्याचे कौतुक करावे तेवढं कमीच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *