रुग्णवाहिकेतून गुरांची वाहतूक

एका रुग्णवाहिकेतून गुरांची अवैध वाहतूक करण्याचा धक्कादायक प्रकार जळगावातील औद्योगिक वसाहत परिसरात उघडकीस आला आहे. रुग्णवाहिकेतून गुरे घेऊन जात असताना औद्योगिक वसाहतमध्ये एका रिक्षाला धक्का लागल्याने रिक्षा चालकाने वाहन थांबवल्याने हा प्रकार उघडकीस आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या रुग्णवाहिकेत सहा गुरे होती. त्यापैकी २ मृत अवस्थेत आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली. रुग्णवाहिका चालक फरार झाला असून वाहन पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे. दरम्यान,  संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *