पुण्यातील उरुळी देवाची – फुरुसुंगी कचरा डेपोमध्ये आग

पुण्यातील उरुळी देवाची आणि फुरुसुंगी येथील कचरा डेपोला आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

उरूळी देवाची आणि फुरुसुंगी कचरा डेपोमधील हंजर प्रकल्पाच्या परिसरात शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. आगीचे स्वरुप भीषण असल्याने परिसरात सर्वत्र धूराचे लोट पसरले होते. याचा फटका परिसरातील वाहनचालकांना बसला. धूरामुळे त्यांना वाहन चालवताना अडथळा येत होता. आगीचे नेमके कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *