चांगल्या पतीसाठी त्या कापतात केस

सुखी जीवन व सुखी वैवाहिक आयुष्यावर तुम्हाला अनेक गोष्टी माहीत असतील. सुखी वैवाहिक आयुष्याची ओढ वा इच्छा केवळ भारतातच आहे, असे नाही तर जगातील अनेक देशांत त्यासाठी लोक विचित्र प्रथा-रूढी पाळतात.

दक्षिण अफ्रिकेतील इथिओपिया आणि सोमालियाच्या मधोमध असलेल्या वस्तीतील बोराना जमातीच्या युवती/तरुणी चांगला पती मिळावा म्हणून विवाहाआधी आपल्या डोक्याचा मोठा भाग टक्कल करून घेतात. अशा प्रकारे डोक्यावरील मोठ्या भागावरील केस पूर्णपणे काढून टाकले की चांगला पती मिळतो, असा त्यांचा समज आहे.

येथे लग्नानंतर मुलींना केस वाढवायला परवानगी दिली जाते. फोटो काढणेही चांगले समजले जात नाही. फोटो काढल्यास शरीरातील रक्त कमी होते, असा त्यांचा समज आहे. समाजात होत असलेल्या बदलांचा चांगला परिणाम या जमातीवरही होत आहे. आता हे लोक शिक्षणाकडे वळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *