बांग्लादेश प्रसिद्धी माध्यमांचा माज, टीम इंडियाचे केले मुंडन

बांग्लादेश प्रसिद्धी माध्यमांचा माज, टीम इंडियाचे केले मुंडन

टीम इंडियाला वन डे मालिका गमवावी लागली. याबाबत बांग्लादेशमध्ये विजयाची मुजोरी दिसून आली आहे. बांग्लादेशमधील काही प्रसिद्धी माध्यमांनी टीम इंडियाची खिल्ली उडवलेय. चक्क एका वृत्तपत्राने टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुंडन केलेलं दिसत आहे.

बांग्लादेशने पहिल्यांदाच भारताविरोधात वन डे मालिका जिंकली. तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दोन विजय मिळवत बांग्लादेश क्रिकेट टीमने मालिकेवर कब्जा केला. व्हाईटवॉश टाळताना तिसरी वन डे मोठ्या रन्सने भारताने जिंकली.

टीम इंडियाच्या वन डे पराभवावर बांग्लादेशच्या एका वृत्तपत्राने खेळ भावनेला तिलांजली दिल्याचे दिसून आलेय. अर्ध मुंडन केलेले फोटो छापून खेळाडूंचा अपमान केलाय. २९ जून २०१५ रोजीच्या अंकात खिल्ली उडविणारा फोटो छापला आहे.

बांग्लादेशच्या या वृत्तपत्राचा माज दिसून आलाय. या मालिकेत टीम इंडियाला सळो की पळो करुन सोडलेल्या बांग्लादेशचा गोलंदाज मुस्ताफिजूरच्या हातात कटर आहे. भारतीय खेळाडूंचे अर्ध मुंडन झाल्याचे दिसते. यामध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, शिखर धवन यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *