मध्य रेल्वेवर उद्या जम्बोब्लॉक

उद्या कल्याण-डोंबिवली आणि त्यापलिकडून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.. रविवार असल्यानं मध्यरेल्वेचा नेहमीचा मेगाब्लॉक उद्या जंबो ब्लॉक असणार आहे.

डोंबिवली आणि कल्याण दरम्यान धीम्या मार्गावरची वाहतूक तब्बल आठ तास बंद ठेवण्यात येणार आहे. ठाकुर्ली स्टेशनच्या नुतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. ते उद्या पूर्ण येणार आहे.

त्यासाठी सकाळी 9.20 मिनिटांपासून 5.20 मिनिटांपर्यंत धीम्या मार्गावरची संपूर्ण दिवा ते कल्याण दरम्यान बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरच्या ठाकुर्ली आणि कोपर या स्थानकांदरम्यान थांबणार नाहीत. दरम्यान सीएसटीहून सुटणाऱ्या डोंबिवली लोकल मात्र कोपर स्थानकावर थांबतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *