इंग्लंडच्या राणीला आवडतो चॉकलेट बिस्कीट केक

इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) या प्रवासाला जेथे जातील तेथे त्यांचा खूप आवडता चॉकलेट बिस्किट केक असतो. विशेष म्हणजे हा केक घरी बनवलेला असतो. राणी यांचा प्रवास विमान, रेल्वे किंवा कारमधून असेल तरीही त्या केक स्वत:सोबत ठेवताच. राणींसोबत त्यांची आवडती लौनर हँडबॅग असते. ही हँडबॅग आणि केक या दोन गोष्टी राणी कधीही घरी विसरत नाहीत. ही माहिती राणीच्या महालातील माजी स्वयंपाकी डॅरेन मॅकग्रॅडी यांनी ‘हार्पर्स बाझार’ला दिलेल्या मुलाखतीत उघड केली. मॅकग्रॅडी हे राजघराण्याच्या सेवेत जवळपास १५ वर्षे होते. ते म्हणाले की राणी आपण कधीही चॉकलेट बिस्कीट केक खाण्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करून घेतात. राणीने त्या स्वत: बटाटे, पास्ता आणि लसणाच्या फार मोठ्या चाहत्या नाहीत, असे नुकतेच म्हटले. हा केक तयार करण्यास मला खूप महत्व द्यावे लागायचे. राणी प्रत्येक दिवशी केकची एकेक छोटीशी स्लाईस घेतात परंतु तुम्हाला तो सगळाच्या सगळा पाठवावा लागतो जणू काही तो त्या सगळाच खाणार आहेत, असा विचार करून.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *