विरोधकांनी काढली सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मुद्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करत विरोधकांनी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली.

विधान भवन परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधकांनी विविध घोषणा फलक हाती घेऊन घोषणाबाजीही केली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वारंवार मागणी करूनही सरकारने कर्जमाफी न केल्याने राज्य सरकारची प्रेतयात्रा काढावी लागली.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष यापुढे आणखी तीव्र करू, असं विरोधकांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *