चांदूररेल्वे येथील माजी आमदार तथा जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. पांडुरंग ढोले यांचे कुऱ्हा येथे जात असताना टेंभुर्णीनजीक भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी सकाळी घडली. डॉ. ढोले हे स्वत:च्या चारचाक बोलेरो वाहनाने कुऱ्ह्याकडे निघाले होते. वाटेत टेंभुर्णीनजीक त्यांचे वाहन झाडावर धडकले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना अमरावतीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांना वाचविण्यात यश आले नाही. बुधवारीच ते जनता दलाच्या बैठकीकरिता मुंबईला गेले होते. त्यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
