मोदींनी केजरीवालांना भेट नाकारली

मोदींनी केजरीवालांना भेट नाकारली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारली आहे. ‘अगदीच तातडीचं काम असेल तर गृहमंत्री वा अर्थमंत्र्यांची भेट घ्या’, असा संदेशच पंतप्रधान कार्यालयाकडून केजरीवाल यांना देण्यात आला आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याकडून पंतप्रधानांची भेट मागण्यात आली होती. गेल्या १० दिवसांपासून केजरीवाल यांचे कार्यालय पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे. मात्र, पंतप्रधानांकडून केजरीवाल यांना भेटीसाठी वेळ देण्यास नकार कळवण्यात आला आहे. व्यस्त कार्यक्रमांमुळे पंतप्रधान आपणास भेटू शकणार नाहीत. आपण गृहमंत्री किंवा अर्थमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, अशा प्रकारचे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे.

दरम्यान, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात अनेक कारणांनी ‘जंग’ सुरू आहे. दिल्लीला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरही केंद्राकडून ‘आप’ला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधानांनी केजरीवाल यांना भेट नाकारल्याने त्यावरून दिल्लीचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *