खडसेंवर आरोप करणारा हॅकर मनिष भंगाळेला अटक

माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा खळबळजनक आरोप करणारा हॅकर मनिष भंगाळेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुंबई गुन्हे शाखेने हॅकर मनिष भंगाळेला अटक केलं.

भंगाळेने केलेल्या आरोपांची चौकशी पोलीस करत होते आणि याच प्रकरणात पोलिसांनी आता मनिष भंगाळेला अटक केली आहे.

दाऊद -खडसे कथित कॉल प्रकरण

मंगेश भंगाळे या इथिकल हॅकर्सने दाऊदचे कॉल ट्रेस केल्याचा दावा केला. दाऊदच्या कॉल लिस्टमध्ये 10 भारतीय नंबर होते, त्यापैकी एक नंबर एकनाथ खडसेंचा असल्याचा दावा आप नेत्या प्रीती मेनन यांनी केला.

मंगेश भंगाळेनेच 2014 ते 2015 दरम्यान हॅकिंग करुन दाऊदनं कुणा-कुणाला कॉल केले होते, याची माहिती बाहेर आणली होती. त्यात आढळलेल्या 4 क्रमांकात एक नंबर खडसेंचा आहे, असंही त्यानं म्हटलं होतं.

याशिवाय मनिष भंगाळेने पत्रकार परिषद घेऊन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद यांच्या कथित कॉलप्रकरणी माहिती दिली.

मनीष भंगाळेने दाऊदच्या संपर्कात असलेल्या पाच नंबरची माहिती सायबर सेलला दिली होती. त्यापैकी एक नंबर खडसेंचा असल्याचा आरोप केला होता.

पोलिस यंत्रणा इतर चार नंबरची माहिती काढत नाहीत. ही माहिती काढण्यास किंवा जाहीर करण्यास पोलिस यंत्रणा  घाबरते का, सायबर सेल दबावाखाली आहे का?, असे प्रश्नही मनिष भंगाळेने केले होते.

इतर नंबरची माहिती शोधण्यापेक्षा पोलीस आरोपी असल्याप्रमाणे आम्हाला चौकशीसाठी बोलावत असल्याचा आरोप मनीष भंगाळे आणि वकील गितांजली लोखंडे यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *