किचन टिप्स

भाज्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून ठेवल्यास जास्त काळ ताज्या राहतात.
कोमेजलेली -शिळी भाजी पुन्हा ताजी होण्यासाठी थंड पाण्यात लिंबू पिळून त्यात 2 तास ठेवल्यास भाजी पुन्हा टवटवीत दिसेल.
फ्रिज नसेल तर दूध सोडियम बायकार्बोनेट टाकून उकळवावे. ते फाटत नाही किंवा खराबही होत नाही.
भात शिजवताना त्यात लिंबाचे थेंब टाकल्यास भात मोकळा व चवदार बनतो. पुदिन्याची सुकी पाने टाकल्यास छान चव येते.
तयार समोसे नंतर खायचे असतील तर फ्रीझरमध्ये ठेवावे व खाण्या पूर्वी दोन तान आधी बाहेर काढून कमी तापमानावर बेक करून वाढावेत. ताजे समोसे खाण्याची मजा येते.
जास्त पिकलेले टोमॅटो थंड पाण्यात मीठ घालून त्यात रात्रभर ठेवल्यास सकाळी ताजे व कडक होतात.
सुका मेवा सहज कापता यावा म्हणून अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवून गरम सुरीने कापावा.
फ्रिजमध्ये फ्रेशनर स्प्रे मारू नये. त्यामुळे खाद्य पदार्थांना स्प्रेचा वास येतो.
अंडे उकडण्यापूर्वी अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवल्यास उकडल्यावर साल सहज निघते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *