मुलगा नसल्याने सतत टोमणे ऐकावे लागायचे याचाच राग येऊन महिलेनं शेजारीच राहणा-या आपल्या पुतण्याचा खून केला आहे. पुण्यातल्या हडपसरमध्ये ही घटना घडलीय. माऊली विनोद खांडेकर असं या चिमुरड्याचं नाव आहे. अनिता खाम खांडेकर असं आरोपी महिलेचं नावं आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे.
हडपसर येथील काळेपडळ ससाणेनगर परिसरातून काल सकाळी माऊली विनोद खांडेकर हा ५ वर्षाचा मुलगा बेपत्ता झाला होता.
पोलीस तपासात मुलाचा त्याच्या सख्या काकूनेच गळा आवळून खून करून काहीकाळ घरामध्ये खाटेखाली मृतदेह लपवून ठेवला नंतर घरातील मंडळी व पोलीस मुलाच्या शोधात घराबाहेर पडल्यानंतर घरामागील बाजूस असणाऱ्या पाण्याचा ड्रम मध्ये टाकला.