न्यायालयाने फेसबूकवर करावयाच्या कारवाई संदर्भात टेलिकम्युनिकेश अॅथॉरिटीली याबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानच्या फेडरल इन्वेस्टिगेशन एजंसीच्या डीजींनी न्यायालयात सांगितले की त्यांनी यासंदर्भातील आपली चौकशी पूर्ण केली आहे आणि दोन दिवसांपूर्वी यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तसेच ईशनिंदेसंदर्भातीत मजकूर शेअर करणाऱ्या व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे.
एफआयएसने याबाबत फेसबूकशी चर्चा केली आहे. आता फेसबुकचे प्रतिनिधीमंडळ याबाबत तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानात येणार आहे. न्यायमूर्ती सिद्धिकी यांनीही बंदी घालण्यापूर्वी फेसबूकला एक संधी देण्यात यावी, असे मत नोंदवले आहे. त्याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अशाप्रकारचा मजकूर हटवण्यात यावा किंवा ब्लॉक करण्यात यावा असे सांगितले होते. तसेच असा मजकूर टाकणाऱ्यांना कठोर शिक्षाही मिळाली पाहिजे असेही ते म्हणाले.