दादरमध्ये मनसे कार्यालयाबाहेर युवकावर हल्ला

मनसे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या दादर येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर एका युवकावर हल्ला झाला. आज रात्री आठ वाजता ही घटना घडली.

विनोद नाटेकर  असे या युवकाचे नाव असून त्याच्यावर  धारधार शस्त्राने चेहऱ्यावर वार करण्यात आले. या  हल्ल्यात नाटेकर गंभीर जखमी झाला आहे.

इतक्या अचानक ही घटना घडली की हल्लेखोरांचा माग काढणे इतरांना शक्य झालं नाही. कार्यालयाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही मधे घटना चित्रित झाली नसली तरी घटनास्थळी दोन अज्ञात युवक संशयास्पद फिरताना आढळत असल्याचे कॅमेरानी टिपलेय.

हल्ला करून पळ काढताना हल्लेखोरांच्या चपला पायातून निसटल्या. नाटेकर यांना तातडीने नजीकच्या शुश्रूषा रुग्णयाल्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असून शिवाजी पार्क पोलीस हल्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *