नागपुरात सापाचे विष विकणाऱ्या दोघांना अटक

सापाचे जहाल विष  विकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून विष जप्त करण्यात आले आहे.

गोपालसिंग गौर आणि रोषण अमृतवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून सुमारे ७० मिलीलिटर नागाचे विष जप्त करण्यात आले आहे.

गोपाल सिंग याने हे विष सावनेर तालुक्यातून एका व्यक्तीच्या घरून चोरल्याची माहिती दिली आहे.. नंतर नागपुरात येऊन विष विकण्यासाठी तो काही फार्मा कंपनीच्या शोधात होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. सर्पमित्रांच्या मदतीने पोलिसांनी सापळा रचून नागपूरच्या छत्रपती चौकातून दोघांनाही विषासह ताब्यात घेतले.

चार छोट्या काचेच्या बॉटल्समध्ये हे विष ठेवण्यात आले होते. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी दोघांनाही वन विभागाच्या ताब्यात दिले असून वन विभाग पुढील तपास करीत आहे. जप्त केलेल्या विषाची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत लाखोंच्या घरात असल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *