राधाबाईंचं वेदनादायी जगणंं झालं ‘सोन्याचं’!

पायात नादावणारे चाळ…हातात हिरवा-पिवळा चुडा…गळ्यात सोन्या-पुतळ्यांची माळ…केसाला मोगऱ्याचा गजरा अन् तोंडात पानाचा तोबरा भरलेला असला की हे रूप कुणाचं आहे हे सांगावं लागत नाही. ‘तमाशातील बाई’ असं बिरूदच तिला लाभलेलं असतं. परंतु, राधाबाईंची कहाणी मात्र यापेक्षा वेगळी आहे. आज सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते विठाबाई नारायणगावकर तमाशा जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे. एका नाशिककर कलावंताचा हा सन्मान नाशिकची मान उंचावणारा ठरणार आहे.

राधाबाई कारभारी खोडे-नाशिककर असं त्यांचं नाव. तमाशातील हे मोठं नाव इतकं मोठं की त्यांच्या नावाने आज एक फड उभा आहे. हिराबाई नाशिककर आणि राधाबाई नाशिककर ही तमाशातली दोन मोठी नावं. हिराबाईंनी तमाशाचा फड चांगलाच गाजवला. त्याचप्रमाणे राधाबाईदेखील कमी नाही. गेल्या ४० ते ५० वर्षांपासून त्या तमाशामध्ये काम करीत आहेत.

लय भारी वाटतंय. भयंकर कष्ट केले, त्याचं चीज झालं. देवाने माझं गाऱ्हाणं ऐकलं. हे माझं यश असलं तरी त्याला अनेकांच्या आशीर्वादाची जोड आहे. सरकारचेही लई धन्यवाद की त्यांनी माझी गरिबाची दखल घेतली. हा पुरस्कार मी आई शेवंताबाई पागे यांच्या पायी लावते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *