वाकडमध्ये दोन मुले बेपत्ता

वाकड येथील ममता जकात नाक्याजवळील एका डबक्यात रविवारी दुपारी दीडच्या सुमारास दोन मुले बुडाल्याचा संशय असून काहींनी ती मुले तेथून पळाल्याचे सांगितले. मात्र ती मुले बेपत्ता असल्याने अग्नीशामक दलाच्या जवानांकडून मुलांचे शोधकार्य सुरु आहे.

वाकड येथील ममता जकात नाक्याजवळ पावसामुळे तयार झालेल्या एका पाण्याच्या डबक्यात दोन मुलांनी उडी घेतली. यावेळी ती मुले या खोल डबक्यात बुडाली असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली. तर काही नागरिकांनी मात्र ती मुले तेथुन पळुन गेल्याचे सांगितले.

मुले बुडाल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केल्यामुळे अग्नीशामक दलाचे जवान मुलांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *