उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या दणदणीत यशाचा परिणाम मंगळवारी शेअर मार्केटवर पाहायला मिळला. केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाने उत्तरप्रदेशात 325 जागा जिंकत जबरदस्त विजय मिळवल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आणि निफ्टीने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडत 9100 चा आकडा पार केला. निवडणूक निकाल आणि होळीनंतर मंगळवारी शेअर बाजार सुरु झाल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये 500 आणि 150 अंकांची झाल्याचं दिसलं.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये सकाळच्या सत्रात तर सर्वोच्च पातळी गाठत, 600 अंकांचा टप्पा गाठला, निफ्टीमध्ये आता 125 ते 130 च्या आसपास वाढ आहे. तर मुंबई शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 450 ते 500 अंकांची वाढ पाहायला मिळत आहे. दुसरीकडे रुपयाही वर्षभरातील मजबूत स्थितीत आला असून डॉलरच्या तुलनेत 42 पैशांनी वाढला आहे. रुपयाही गेल्या वर्षभरातील सर्वोच्च पातळीवर आला आहे.
