ऑस्ट्रेलियात बुटफेक -आप’च्या भगवंत मान

आम आदमी पार्टीचे खासदार भगवंत मान यांच्यावर ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे बुटफेक करण्यात आली.

अनिवासी भारतीयांच्यावतीने मेलबर्न येथील अजुबा रेस्टॉरंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवंत मान या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांच्यावर बुटफेक करण्यात आली. भगवंत मान यांनी बरगाडी कांडच्या वेळी मद्य प्राशन करुन गुरुद्वारामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भगवंत मान यांच्यावर बुटफेक करण्यात आल्याची माहिती अकाली दलाच्या समर्थकाने दिली.

रेस्टॉरंटमध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मान यांच्या दिशेने बुटफेक केली. परंतु सुदैवाने हा बुट मान यांना लागला नाही. ही घटना घडल्यानंतर अर्धा तास भगवंत मान थांबले व भाषण संपल्यानंतर ते घटनास्थळावरून निघून गेले. आपच्या कार्यकर्त्यांनी बुट फेकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले. यावेळी आप समर्थकांकडून त्याला मारहाणही करण्यात आल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *