अमेरिकेत शीख तरुणावर गोळीबार

तू तुमच्या देशात परत जा, असे ओरडत एका ३९ वर्षीय भारतीयावर त्याच्या घराबाहेर गोळी झाडण्यात आली. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान या तरुणाशी संपर्क साधून परराट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्याला आश्वस्त केले आहे.

केन्ट येथे शुक्रवारी ही घटना घडली. दीप राय असे या जखमी तरुणाचे नाव आहे. एक पगडी घातलेला शिख आपल्या वाहनाची टागडुजी करत असताना एक व्यक्ती त्याच्याकडे आली. मुख्य रस्त्यापासून चालत आलेल्या त्या व्यक्तीने या शिख तरूणाशी हुज्जत घालायला सुरवात केली.

केंट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यातील वाद वाढल्यानंतर त्या हल्लेखोराने तु तुझ्या देशात परत जा, असे ओरडत त्याच्यावर गोळी झाडली. ती शिख तरूणाच्या दंडावर लागली. दरम्यान, जखमीने दिलेल्या वर्णनानुसार हल्लेखोर हा सहा फूट उंच गोरा होता. त्याने आपला अर्धा चेहरा झाकून घेतला होता.

या जखमी जिवीताला धोका नसला तरी ही घटना आम्ही गांभीर्याने घेतली आहे, असे केंटचे पोलिस प्रमुख केन थॉमस यांनी सांगितले आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तपासाला वेग दिला आहे. त्यांनी यासाठी एफबीआयची मदत घेतली आहे.

ज्यावेळी अशा घटना वेशभुषा आणि राहणीमानावरून घडतात, त्यावेळी नागरिक त्यात भावनात्मकदृष्टय़ा गुंततात. त्यामुळे या प्रकरणांचे गांभीर्य अधिक वाढते असे केंटचे पोसि आयुक्त जरोड कासनेर यांनी सांगितले.वंशद्वेशातून भारतीयांवर हल्ले होत असल्याने अनिवासी भारतीयांमध्ये घबराट पसरली आहे.

केंट हे सिएटलपासून ३० किमी अंतरावर गाव आहे. दरम्यान, भारताच्या परराष्टमंत्री सुषमा स्वराज यांनी जखमी युवकाच्या वडिलांशी रविवारी संपर्क साधला. त्याचे वडील हरपाल सिंग यांन्नी मुलाच्या हातावर गोळी लागली असून त्याच्या प्रकृतीला धोका नसल्याचे सांगितले त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे सुषमा यांनी ट्विट केले आहे.

अमेरिकेच्या भारतातील उच्चायुक्तांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेत राहणा-या भारतीयांवर गोळीबार केल्याची आठवडाभरातील तिसरी घटना आहे. गुरुवारी अमेरिकेतील भारतीय वंशाचे उद्योजक हरनिश पटेल यांची रात्री ११.३० च्या सुमारास लँकास्टरस्थित आपले दुकान बंद केले.

त्यानंतर दहा मिनिटांनी पटेल यांच्या घराबाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यापूर्वी कनसासमध्ये श्रीनिवास कुचिबोतला या भारतीय तरुणाची वंशभेदातून हत्या झाली होती. श्रीनिवासच्या हत्येच्या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांचा निषेध केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *