पुण्यात भंगार गोदामाला भीषण आग

चिखलीमध्ये कुडाळवाडी येथे रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान एका भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली. या घटनेत जवळजवळ 20 ते 25 भंगारची दुकानं जळून खाक झाली आहेत.
दरम्यान, घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 15 गाड्या दाखल झाल्या आहेत.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आगीने रौद्र रुप धारण केले असल्याने आग विझवण्यात फायर ब्रिगेडला अद्याप यश आलेले नाही.
भीषण आगीवर परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिकांना यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *