अवैध गर्भपात करणा-या डॉक्टराचा मृत्यू

नाशिक मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याचा हदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे.  डॉ. बळीराम शिंदे असे मृत कैद्याचे नाव आहे. अवैध गर्भपातप्रकरणी शिंदेंना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली होती.
न्यायालयीन कोठडीत शिक्षा भोगत असताना शुक्रवारी सकाळी शिंदेंचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.  काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षकांनी शिंदेंच्या हॉस्पिटलवर धाड टाकून विना परवाना गर्भपात आणि लिंग निदान चाचणी केली जात असल्याचे निदर्शनास आणले होते.
याप्रकरणी महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय देकाटे यांनी मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यानंतर गर्भ लिंग निदान चाचणी व अवैध गर्भापत प्रकरणी कायद्यान्वये शिंदेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, डॉ. शिंदेंच्या मृत्यूप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *