बरॅकमध्ये जवानाने घेतला गळफास, कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

देवळाली कॅम्प (नाशिक) येथील लष्कराच्या तोफखाना विभागातील ११४ रॉकेट बॅटरी विभागाचा जवान डी. एस. राव मॅथ्यूज (वय ३५) याने हेग लाईन येथील जुन्या बरॅकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
हा जवान मूळचा कोल्लम (केरळ) येथील आहे. त्याच्याकडे मोबाइल, डायरी आणि मल्याळी भाषेत लिहिलेली एक चिठ्ठी आढळली आहे. या जवानाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सुभेदार गोपालसिंह यांनी याबाबत देवळाली कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. जवानाचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. याबाबत त्याच्या पत्नी आणि वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. एका जुन्या इमारतीत कुजलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत अनेक तर्कवितर्क लावून विविध अफवांना पेव फुटले होते. परंतु या केवळ अफवा असून जवानाने आत्महत्या केल्याचे शवविच्छेद्नातून स्पष्ट झाले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *