भाजपचे नवनिर्वाचीत नगरसेवक आज कोकण भवनला कोकण विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाणार आहेत. पण त्याआधीच त्यांना एक नवा भिडू मिळालाय.
अभासेच्या नगरसेवक गीता गवऴी भाजपच्या गोटात सामील झाल्या आहेत. निवडून आल्यानतर पक्षाच्या नगरसेवकांची एकत्र नोंदणी आयुक्तांकडे होणे गरजेचे असते. त्यानुसार आज सोपस्कार पार पाडण्यात येणार आहेत.
कोकण विभागात असलेल्या मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मनपाचे भाजपचे नगरसेवक नोंदणीसाठी आज कोकण भावन येथे जातील.
याआधी अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी काल रात्री वर्षावर जाउन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तर त्यापूर्वी गीता गवळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही भेटल्या होत्या त्यामुळे गीता गवळी यांचा पाठींबा नक्की भाजप की शिवसेनेला? हा प्रश्न अनेकांना पडला होता.
