आंध्रप्रदेशात कालव्यात बस कोसळल्याने १० जणांचा मृत्यू

कालव्यामध्ये बस पडल्यामुळे आंध्रप्रदेशात १० जणांचा मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशात कृष्णा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ही घटना घडली. ३८ प्रवाशांना घेऊन जात असलेली दिवाकर ट्रॅव्हल्सची बस कालव्यात पडली. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ही बस भुवनेश्वरकडून येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *