खेळण्याच्या बहाण्याने २२ वर्षीय नराधमाने केला चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

सांगवीत नराधम पित्याने सावत्र मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये २२ वर्षीय तरुणाने चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भोसरीमध्ये राहणा-या २२ वर्षीय तरुणाने शेजारी राहणा-या ४ वर्षीय चिमुरडीला खेळायच्या बहाण्याने घरी नेले होते. आरोपी हा त्या चिमुरडीसोबत रोज खेळायचा. त्यामुळे तिच्या आईनेही मुलीला त्याच्यासोबत जाण्यास परवानगी दिली होती. २४ फेब्रुवारीला दुपारी घरात कोणीही नसताना त्याने त्या चिमुरडीवर अत्याचार केला. घरी आल्यावर चिमुरडीने घडलेल्या प्रकाराची माहिती आईला दिली आणि तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी नराधम तरुणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटकही केली आहे. न्यायालयाने नराधमाला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक चौकशी करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *