सीईटी परीक्षा ११ मे ला होणार

राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा  ११ मे रोजी होणार आहे. सीईटी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत.

सीईटी अर्ज भरण्याची मुदत २३ मार्चपर्यंत ठेवण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८०० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ६०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *