एसटीला कंटेनरची धडक, २० प्रवासी ठार

एसटीला कंटेनरची धडक, २० प्रवासी ठार

धुळे-चाळीसगाव रस्त्यावर कंटेनर आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एसटीमधील २० प्रवासी ठार झाले असून, अन्य २५ प्रवासी जखमी झाले आहेत.

गुरुवारी दुपारी चिंचगव्हाण फाटयावर हा भीषण अपघात झाला. वेगात असलेल्या कंटेनरने समोरुन एसटीला दिलेली धडक इतकी जोरदार होती की, एसटीच्या एकाबाजूचा चेंदामेंदा झाला.

एसटी गुजरातमधील सूरत येथे चालली असताना हा अपघात झाला. काही प्रवाशी जागीच ठार झाले तर, काहींचा रुग्णालयाच्य़ा वाटेवर असताना मृत्यू झाला.

जखमींना उपचारासाठी धुळे आणि चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असण्याची दाट शक्यता आहे. घटनास्थळी मदत कार्य सुरु असून, या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *