मुंबईत सहा मार्चला निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या दिवशीच बारावीचा पेपर आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास कोणताही अडथळा येऊ नये म्हणून बारावीचा पेपर पुढे ढकलावा अशी मागणी मराठा क्रांती मूक मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. बारावीचा ११ ते २ या वेळेत गणित आणि संख्याशास्त्र तर दुपारी ३ ते ६ यावेळेत व्यावहारिक हिंदी या विषयाचा पेपर आहेत. एचएचसी व्होकेशनलचा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयाचा पेपर होणार आहे. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या शिष्टमंडळाने शालेय शिक्षणमंत्री तावडे यांची भेट घेतली.