अफगानिस्तानमध्ये हिमस्खलन लोकांवर कहर करत आहेत. यामध्ये आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकाच गावातील 50 लोकांचा यामध्ये समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तानमध्ये हिमस्खलनमुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागात देखील हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.
अफगानिस्तानमध्ये हिमस्खलनामुळे तीन दिवसात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचं आणि रस्त्याचं नुकसान झालं आहे.