या उपायांनी महिन्याभरात घालवा चष्मा

सतत अनेक तास काम करणे, झोप पूर्ण न होणे अथवा मोबाईल-कम्प्युटरवर तासन् तास बसण्याने हल्ली कमी वयातच चष्मा लागू लागलाय. मात्र आयुर्वेदात असे अनेक उपाय आहेत ज्यामुळे दृष्टीमध्ये स्पष्टता आणून चष्म्याचा नंबर कमी केला जाऊ शकतो.

१. जीरे आणि खडीसाखर एकत्र प्रमाणात घेऊन वाटा. हे मिश्रण दररोज एक चमचा तुपासोबत घ्या.

२. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तिळाच्या तेलाने पायांना मसाज करा.

३. दररोज ग्रीन टीचे सेवन करा. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांना निरोगी राखण्यास मदत करतात.

४. रात्री त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवा.

५. रोज रात्री ६-७ बदाम भिजत घाला आणि सकाळी ते खा.

६. ३-४ हिरव्या वेलची एक चमचा बडिशोपसोबत वाटा. हे मिश्रण एक ग्लास दुधासोबत घ्या.

७. गाजराचा ज्यूस नियमित प्यायल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.

८. एक चमचा बडिशोप, २ बदाम आणि अर्धा चमचा खडीसाखर एकत्र करुन बारीक पूड करा. रात्री झोपण्याआधी एक ग्लास दुधात हे मिश्रण टाकून प्या.

९. रोजच्या जेवणात नियमितपणे हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यातील अँटीऑक्सिडंट्स डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखतात.

१०. डोळ्यांच्या चारही बाजूंना अक्रोडच्या तेलाने मसाज करा. यामुळे फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *